Ad will apear here
Next
घनगर्द
भय आणि अद्भुतता यांचे मिश्रण असणाऱ्या कथा हे हृषीकेश गुप्ते यांचे वैशिष्ट्य ‘घनगर्द’ कथासंग्रहातील कथांमधून जाणवते. पहिल्या ‘घनगर्द’ या कथेतून पौगंडावस्थेतील गार्गीला आपण खोल दरीत पडत आहोत, बचावासाठी धावलेल्या बाबाचाही तोल जातो, अशी जाणवणारी भीती व वास्तवात ज्या प्रसंगांना सामोरे जावे लागते त्यातून होणारी तिची घालमेल दिसते.

लेखनासाठी बैठक मारलेली असताना बाहेर पावसात भिजून आलेली अनोळखी व्यक्ती व जाताना त्याने नायकाला दिलेली कथांची अनेक बीजे असलेली कुपी, लहानपणी केलेल्या आंब्यांची चोरी यामुळे निर्माण झालेली अपराधाची भावना व देवधर काकुंचे पात्र यातून नायकाचे भयाने भारलेले आयुष्य ‘पानगळ’मधून समोर येते. भूतकाळाच्या सावटात मनासारखे आयुष्य पेलताना द्यावा लागणाऱ्या मोबदल्याचे रूप ‘मुआवजा’मधून जाणून घेताना दाहक भय समोर येते. ‘रामवाटा’तील वास्तव व कल्पनांच्या मिश्रणातून उमटलेले भय वाचकांना खिळवून ठेवते.  

प्रकाशक : रोहन प्रकाशन
पाने : २३६
किंमत : २५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZSVBT
Similar Posts
शिन्झेन किस जपानमधील विज्ञानकथा लेखक शिनइची होशी यांच्या कथा या अद्भुत असतात. वेगळे कथानक आणि धक्कादायक शेवट हे त्यांच्या कथेचे वैशिष्ट्य. यातील निवडक कथा निस्सीम बेडेकर यांनी ‘शिन्झेन किस’ या संग्रहातून मराठी वाचकांपर्यंत पोचविल्या आहेत. यात १८ कथा अगदी छोट्या तीन-चार पाणी आहेत.
‘पानगळ’ : मनाला चक्रावून टाकणारं अद्भुत कोडं हृषीकेश गुप्ते या लेखकाच्या लांब पल्ल्याच्या गूढ कथा कायमच व्यक्ती आणि त्यांच्या भावनावलयांना शब्दबद्ध करू पाहतात. आदिम जाणिवा, मूलभूत गरजा-भावना, डोकं चक्रावून टाकणारी कोडंसदृश मांडणी आणि ठराविक टप्प्यांवर वाचकाला बसणारे जबरदस्त धक्के या सर्वांतून जन्म घेणाऱ्या या कथा असतात. याच प्रकारच्या घटक तत्त्वांचा
काळेकरडे स्ट्रोक्स मध्यमवर्गीय कुटुंबातील कॉलेजला जाणाऱ्या युवकाच्या जीवनात अनेक मित्र-मैत्रिणी येत असतात. अशा वेळी घरची ओढ कमी होत जाते आणि बाहेरच मन गुंतते; पण हे गुंतणे कधी कधी अपूर्ण राहते आणि जीवन कोरडेपणाने पुढे चालू राहते.
‘चांगल्या साहित्याला वाचकवर्ग आहे’ पुणे : ‘वाचन जागर अभियानासारख्या उपक्रमांची सध्या गरज आहे. सोशल मीडियामुळे वाचन आणि लेखनावर परिणाम झाला असला तरी चांगल्या साहित्यासाठी वाचकवर्ग आजही आहे. सध्या ई-बुक, किंडल अशा वेगवेगळ्या माध्यमांमधून वाचन शक्य आहे. त्या माध्यमांचा वापर करून का होईना, लोकांनी दर्जेदार वाचावे,’ अशी अपेक्षा ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language